Share

कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती- राहुल गांधी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, राहूल यांनी कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती, असे वक्तव्य केल्याची माहिती राऊत यांनी आपल्या सामना रोखठोकच्या माध्यमातून दिली आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’प्रियंका आणि राहुल गांधी ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे. त्यांच्या कामाची पद्धतही वेगळी. उताराला लागलेल्या काँग्रेसला सावरण्याचे सगळ्यात मोठे आव्हान आज राहुल गांधींसमोर आहे. काँग्रेसला बुडविण्याचे व आता काँग्रेस राहत नाही या टोकाच्या विचारापर्यंतचे प्रसंग अनेकदा काँग्रेसच्या जीवनात आले. सध्याचा काळ काँग्रेससाठी सगळ्यात कठीण काळ आहे. पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर काँग्रेस लयाला जाणार असे भाकीत केले जात असे. त्यांच्या मृत्यूनंतर १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आठ राज्यांतून उखडली गेली. विरोधकांनी काँग्रेसवर मृत्युलेख लिहून काँग्रेसवर ‘अंत्यसंस्कार’ही केले आहेत. पण प्रत्येक पराभवांनंतरही काँग्रेस उभी राहिली. गेल्या दहा वर्षांत काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे हे खरे. म्हणून काँग्रेस संपली असे म्हणता येत नाही.

१३ राज्यांतील पोटनिवडणुकांत काँग्रेस पुन्हा विजयी झाली व त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदा मागे घेतले. शेतकऱ्यांशी चर्चा नाही हा निग्रह सोडून गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला. पण ‘माझे शब्द लक्षात ठेवा. सरकारला हे तीन काळे कायदे मागे घ्यावेच लागतील!’ असे सांगणाऱ्या राहुल गांधींचा प्रसारमाध्यमांना सोयिस्कर विसर पडला. कारण माध्यमे आज स्वतंत्र राहिलेली नाहीत आणि काँग्रेस किंवा गांधींची बाजू प्रभावीपणे मांडतील असे लोकही सभोवती दिसत नाहीत. याला जबाबदार काँग्रेसची परंपरागत कार्यपद्धती आहे. नेते निर्माण करण्याची जबाबदारी घेऊन काम पुढे नेण्याची यंत्रणा बंद पडली आहे. यावर राहुल गांधी यांनी त्यांची वेदना व्यक्त केली.

दरम्यान, ‘कॅ. अमरिंदर सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कारकीर्दीत काँग्रेसचा ग्राफ खाली आला. आम्ही एक ‘पोल’ केला. त्यांना मुख्यमंत्री म्हणून फक्त सहा टक्के लोकांनी पसंती दिली. जे मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नव्हते, त्यांना अमरिंदर यांच्यापेक्षा जास्त पसंती मिळाली. त्यांना हे बोलावून सांगितले. निवडणुकीत जनतेला जी आश्वासने दिली ती पूर्ण करा असे सुचवले. त्यांचा प्रतिसाद थंड होता. काहीतरी करा, नाहीतर पक्षाला कारवाई करावी लागेल असे सांगितले. तेव्हा पक्षातले ‘ज्येष्ठ’ कॅ. अमरिंदर यांच्या पाठीशी उभे राहिले. कठोर निर्णय घेऊ नका असे मला सांगू लागले. कॅ. अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबात काँग्रेस संपली असती. या ज्येष्ठांचे काय करायचे? मी तर कधीच कोणाचा अनादर केला नाही,’ असे राहुल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!