🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पवारांच्या मोजक्या भाषणांचा संग्रह असलेले पुस्तक ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. संजय राऊत नेहमीच अग्रलेखातून तसेच मुलाखतीतून विरोधकांवर टीका करतच असतात. मात्र आज त्यांनी थेट कवितेतून विरोधकांवर टीका केली आहे. त्यांच्या या कवितेतून केलेल्या टीकेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली त्याच सोबत संजय राऊत यांच्या या कौशल्याचे देखील सर्वांनी कौतुक केले. शरद पवार यांनी देखील यावर हसून प्रतिक्रिया दिली.
यावेळी राऊतांनी प्रसिद्ध कवी किशोर कदम यांची कविता सादर करून भाजपला जोरदार टोले लगावले आहेत. संजय राऊत म्हणाले, मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून पाहा… खिडकीत उभी राहून पाहा… बघ माझी आठवण येते का? (आता आम्हाला तीन पक्षाला रोज एकमेकांची आठवण येते म्हणून मला ही कविता आठवली), हात लांबव… (आम्ही तिघांनी हात लांबच केलेत एकमेकांसाठी) हात लांबव, तळहातावर झेल पावसाचं पाणी इवलसं तळं पिऊन टाक… बघ माझी आठवण येते का.. अशा पद्धतीने संजय राऊत यांनी कवितेतून निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘म्हणून जास्त हवेत उडायचं नसतं’; निलेश राणेंचा मलिकांवर निशाणा
- मीही इंग्रजीत प्रश्न विचारला असता पण ते आपलेच गाववाले; राऊतांनी उडवली राणेंची खिल्ली
- ‘ते’ कळायला इतके वर्षे लागले तर खरा चू**; निलेश राणेंची जहरी टिका
- एमआयएमची ‘तिरंगा रॅली’ मुंबई वेशीवरच रोखणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त
- आता बस्स..! नागा चैतन्यला घटस्फोट देण्यावर समांथाची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
