मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेतील (Shivsena) यांच्यातील वाद काही केल्या मिटण्याची चिन्हे दिसत नाही. राणे पिता-पुत्र आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शिवसेनेने पुन्हा एकदा नारायण राणेंना डिवचले आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंचा लोकसभेतील किस्स्यावरुन जोरदार खिल्ली उडवली आहे.
लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्याअंतर्गत प्रश्न होता. कनीमोझी यांनी तो प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता. लोकसभेत बोलण्याची राणेंची ही पहिलीच वेळ होती. अभ्यास तेवढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पध्दतीने उत्तर दिले. यावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.
जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढी देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये. लोकसभेत मलासुध्दा राणेंना प्रश्न विचारता आला असता, पण ते आपलेच गाववाले आहेत. आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी देखील नारायण राणेंच्या लोकसभेतील संभाषणावरुन खिल्ली उडवली आहे. नारायण राणेंचा हा व्हिडीओ शिवसेनेकडून व्हायरल करुन नारायण राणेंची खिल्ली उडवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- एमआयएमची ‘तिरंगा रॅली’ मुंबई वेशीवरच रोखणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त
- नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी
- ‘शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, अवघा रंग एक झाला’
- शरद पवारांनी सांगितला नावं लक्षात ठेवयाचा भन्नाट किस्सा, म्हणाले…
- …ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना- चंद्रशेखर बावनकुळे


