Share

नवाब मलिकांचा आता थेट ईडीलाच सवाल; म्हणाले ईडीने काय आता…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात गेल्या दोन वर्षांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर त्या नेत्यांवर ईडी (ED) तसेच इतर वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या. त्यामध्ये सुरवात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापासून झाली. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या देखील सोमय्या मागे लागले असल्याचे दिसत आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत असताना किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला त्याच सोबत त्यांनी वक्फ जमीन घोटाळ्याबाबतही भाष्य केलं आहे. पुणे वक्फ प्रकरणात ईडीने तपास केला. वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयात छापे टाकले. ईडीने वक्फच्या एका अधिकाऱ्याला दोन दिवस बोलावले आणि चुकीच्या पद्धतीने एफआयआर दाखल केला असल्याचे मलिक यांनी म्हटले. ‘वक्फ’च्या प्रकरणात भाजप नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

ईडी आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल बोलताना नवाब मलिक यांनी थेट ईडीलाच सवाल केला आहे, काही दिवसांपासून ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी छापामारी करणार असल्याचे किरीट सोमय्या पत्रकारांना सांगत आहेत. वक्फ प्रकरणी ईडी माझ्या घरी येणार असे किरिट सोमय्या यांनी म्हटले आहे. ईडीने किरीट सोमय्या यांना अधिकृत प्रवक्ता केलं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!