🕒 1 min read
चेन्नई : तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा धक्कादायक अपघात झाला आहे. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या हेलिकॉप्टरमधील (Army Chopper Crash) 2 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे.
सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat), त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून (Chopper Crash) प्रवास करत होते, अशी माहिती मिळत आहे. या दुर्घनेत आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह हाती आल्याचे बोलले जात आहे.
या हेलिकॉप्टरमधून एकूण 14 जण प्रवास करत होते. त्यापैकी चौघांचे मृतदेह सापडल्याचे सांगितले जात आहे. बिपीन रावत हे पत्नीसह उटीला एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. मात्र, कुन्नूरच्या घनदाट अरण्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.
आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या हेलिकॉप्टर अपघाताची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ करण्यात येणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- माझे उत्तर ऐकून चंद्रकांत पाटलांची प्रकृती बिघडेल; राऊतांचा खोचक टोला
- मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर जया बच्चन यांचे ‘लाल टोपी’ घालून प्रत्युत्तर
- तरुण खेळाडूंना करावी लागणार प्रतीक्षा; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दिग्गजच
- शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात; चंद्रकांत पाटलांचा टोला
- जॅकलीनच्या अडचणीत वाढ; ईडीने समन्स बजावल्यानंतर दिल्ली कार्यालयात हजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
