🕒 1 min read
अहमदनगर : राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि आमदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यांच्यावर टीका करताना महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही नगर पंचायत निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा विश्वास देखील सुजय विखे पाटलांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद, नगर पंचायत, विधानसभा या तिन्ही निवडणुका महाविकास आघाडी स्वतंत्रच लढणार आहेत. आपापल्या जागेच्या हिशोबाने एकत्र यायचं, हा यांचा महाराष्ट्रामध्ये फॉर्मुला ठरलेला आहे. जनतेला जितक्या लवकर यांचा ढोंगीपणा लक्षात येईल तितक्या लवकर यांची पोलखोल होईल. हे स्वार्थासाठी फक्त एकत्र आले आहेत, अशी टीका सुजय विखे पाटलांनी केली आहे.
दरम्यान, कोरोना काळात झालेली हानी, वीज बील कनेक्शन, शेतकऱ्यांना दिलेले अनुदान, कोरोना काळात झालेली परिस्थिती या सगळ्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी आपापसात भांडणे रंगवतात आणि मजा करतात. एवढंच काय ते यांचे उद्दिष्ट आहे, असा आरोपही यावेळी सुजय विखे पाटलांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘उपोषण करा नाहीतर मरा, सरकारला कुठलंही सोयरसुतक नाही’
- राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’सत्तेसाठी हिंदुत्वाचे नेसण सोडणाऱ्यांना…’
- …म्हणून एसटी संप चिघळला; माजी मंत्र्याचा राज्यसरकारवर आरोप
- ‘कामावर हजर असलेल्यांनाच पगार मिळणार’
- …तर ओमायक्रॉनचा एक रुग्ण १५-२० जणांना बाधित करु शकतो- डॉ.अमित द्रविड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
