🕒 1 min read
बीड : भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी राज्यातील प्रलंबित निर्णय आणि ओबीसी आरक्षणासह अनेक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रीतम मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. बीडमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सरकारने तातडीने कारवाई करावी, अध्यादेश काढून आतापुरता दिलासा मिळाला आहे. मात्र येणाऱ्या काळातील निवडणुकांचे काय?, असा सवाल प्रीतम मुंडे यांनी केला आहे. राज्य सरकारमधील मंत्री रोज सकाळी आपले विचार मांडतात, परंतु लोकांच्या प्रश्नांवर भाष्य करण्याऐवजी ते केवळ एका व्यक्तीवर बोलतात, हे दुर्दैवी आहे, अशी खोचक टीका प्रीतम मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
भाजपने केलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य सरकारचे डोळे उघडले आणि त्यांनी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अध्यादेश काढला. इम्पिरिअल डेटा मिळणे कठीण काम नाही. परंतु, राज्य सरकारने तारीख पे तारीख केले, यामुळे ओबीसींवर अन्याय झाला आहे. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. अध्यादेश आताच्या निवडणुकांसाठी लागू असला तरी येत्या काळात पालिका, जिल्हा परिषद अशा संपूर्ण राज्यात निवडणुका आहेत येणाऱ्या काळात आणखी निवडणुका आहेत. सरकारने यावर तातडीने कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रीतम मुंडे यांनी केली आहे.
ओबीसींच असलेल आरक्षण घालवण्याच पाप या सरकारने केले.
{ पत्रकार परिषद,बीड }@BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/ZEwJfHjbsr
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) November 23, 2021
आज समाजातील कोणताही घटक राज्य सरकारच्या कामगिरीवर खुश नाही. सर्वसामान्य नागरिकांनी सरकारच्या कामगिरीवर लक्ष ठेवून येत्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी यावेळी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एसटी संपाबाबत शरद पवारांनी अनिल परबांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
- सरकारचं ‘पॉवर सेंटर’ जिथे आहे तिथे मी आता उभा, पवारांच्या भेटीनंतर राऊतांचं वक्तव्य
- चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा खोचक सल्ला; म्हणाले, आधी…
- रुपाली पाटील मनसे सोडणार?, बेधडक वक्तव्याने चर्चांना उधाण
- कट कारस्थानं झाली नसती तर आज निकाल वेगळा असता- शशिकांत शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
