Share

गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल; १५ मंत्री घेणार शपथ

Published On: 

🕒 1 min read

राजस्थान : राजस्थानमध्ये आज(२१ नोव्हें.) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून अशोक गेहलोत(Ashok Gehlot) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात फेरबदलाचा एक भाग म्हणून १५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये ११ कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री असतील. तसेच दुपारी चार वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेमाराम चौधरी, महेंद्रजित मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, ममता भूपेश, भजनलाल जाटव, टिकाराम जुली, गोविंद राम मेघवाल आणि शकुंतला रावत हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील. तसेच याचवेळी आमदार जाहिदा खान, ब्रिजेंद्र ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारीलाल मीना हे राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

या यादीमध्ये सचिन पायलट यांचे समर्थक हेमाराम चौधरी, रमेश मीना, मुरारीलाल मीना आणि ब्रिजेंद्र ओला यांची नावे आहेत. ताईच बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांपैकी राजेंद्र गुढा यांनाही आज मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मागील वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाविरोधात बंडखोर भूमिका घेतल्याने त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले होते. यापैकी विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा यांच्या नावाचा शपथविधी होणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे.

दरम्यान, यापूर्वी राजस्थान सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती काँग्रेसचे नेते प्रताप सिंह खचरियावास यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. तत्पूर्वी शुक्रवारी गोविंद सिंह दोतास्रा, हरीष चौधरी आणि रघु शर्मा यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामे पाठविले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!