Share

उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त सामनातून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

त्रिपुरातील कथित घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. मुस्लिम समाजाने काढलेल्या निषेध मोर्चात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरू झालं आहे. त्यावरुन केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यावर ताशेरे ओढले आहेत.

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन. याच स्मृतीदिनी महाराष्ट्रात अमरावतीत दंगलखोर मोकाट अन् हिंदूवर कारवाई. आमचे हिंदुत्व शेंडीजानव्याचे नाही असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व हे अमरावतीत सिध्द झाले आहे, असं म्हणत केशव उपाध्येंनी उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले आहेत.

ज्वलंत हिंदुत्व असणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी प्रत्येक कडवट शिवसैनिकांना याची निश्चितच प्रचिती येत असणार.  हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी आदरांजली, असं सांगत बाळासाहेबांनी आदरांजली वाहिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!