Share

‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने सामनातून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे.शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपल्याला काय दिले, हा मोठा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. शिवसेनाप्रमुखांनी काळाचे आव्हान स्वीकारण्याचा मंत्र दिला. प्रखर हिंदुत्वाचा, राष्ट्रवादाचा हुंकार दिला! हिंदुत्वावर, हिंदू राष्ट्रावर व्याख्यान देणारे व लाठय़ाकाठय़ांची प्रात्यक्षिके करणारे खूप होते, पण राजकारणात हिंदू म्हणून एकजूट करणे त्यांना जमले नाही. शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंच्या हाती आधी हातोडा दिला. तो हातोडा अयोध्येत निर्भयपणे चालवला. म्हणून आज रामजन्मभूमीवर राममंदिर उभे राहत आहे. असे सामनातून म्हटले आहे.

तसेच हिंदू एकवटला, जात-पंथाच्या भिंती तोडून एक झाला व दिल्लीत हिंदू विचारांचे राज्य सुरू झाले ते आजतागायत व्यापक आहे! गुजरात दंगलीनंतर सारे जग ‘मोदी हटाव, मोदी हटाव’च्या आरोळय़ा ठोकीत असताना आणि त्या आरोळय़ांत भाजपचेच वरिष्ठ मंडळ सामील झाले असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दमदारपणे म्हणाले, ‘छे, छे, मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल. हिंदूंची उमेद मरेल!” हे असे बाळासाहेबांचे बेडर हिंदुत्व. असे म्हणत सामनातून भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.

ओठात एक पोटात दुसरे हे धोरण नाही. ढोंगाला साथ कधीच नाही. महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले. हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. ‘मातृभूमी’ला वंदन करणारा प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा, असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रूप दिले असल्याचे सामनातून म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!