🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड सोमवारी दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. यावेळी भागवत कराड यांनी प्रोटोकॉल मोडली पण डॉक्टरची भूमिका यावेळी चोख बजावली आहे.
कराड यांच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. विमानातील क्रू मेंबर्सने उद्घोषणा करुन ऑन बोर्ड कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती केली. या प्रवाशाचा रक्तदाब कमी झाल्याने त्या फार घाम येत होता. केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड यांनी लगेच त्या प्रवाशाजवळ जाऊन त्याला प्रथमोपचार देत त्याचा जीव वाचवला. त्यांच्या या कार्याचे सर्वानीच कौतुक केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.
Thank you, Hon. Prime Minister @narendramodi ji. I am truly humbled and hope to translate your outstanding commitment and dedication to our country and citizens in my own duties. Following your guidance to serve people through "Seva aur Samarpan".
Jai Hind https://t.co/FHqNqHaQzc— Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) (@DrBhagwatKarad) November 16, 2021
इंडिगो एअरलाइन्सने डॉक्टर कराड हे रुग्णाला मदत करत असतानाचा फोटो ट्विट करत त्याचं कौतुक केलं आहे. इंडिगोने ट्विट करत लिहिले की, ‘आम्ही आपले ऋणी आहोत. आपल्या कर्तव्याबद्दल नेहमीच दक्ष असणाऱ्या या केंद्रीय मंत्र्याचं आम्ही कौतुक करतो. डॉक्टर कराड यांनी एका प्रवाशाला मदत करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली तयारी ही खरोखरच प्रेरणादायी आहे,’ असं म्हणत डॉक्टर कराड यांचे आभार मानले आहे.
A doctor at heart, always!
Great gesture by my colleague @DrBhagwatKarad. https://t.co/VJIr5WajMH
— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2021
पंतप्रधान मोदींनीही इंडिगोचे हे ट्विट कोट करुन रिट्विट करत, ‘ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. भागवत कराड यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे,’ असं पंतप्रधान म्हणाले. यावर रिप्लाय देताना डॉक्टर कराड यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तसेच तुम्ही दाखवलेल्या ‘सेव आणि समर्पण’ या मार्गावरुनच मी जनतेची सेवा करत आहे, असंही कराड म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-न्यूझीलंडचा आज पहिला टी-२० सामना; रोहित-राहुल पर्व सुरु
- इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, लक्ष्य सेनची विजयी सुरुवात
- मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा: विदर्भाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
- टीम इंडियामध्ये कोहलीच्या भूमिकेबाबत रोहितचे स्पष्टीकरण; म्हणाला..
- आम्ही राज्यातील हिंदूंची अवहेलना थांबविणार; सोमय्यांचा यशोमती ठाकूर यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
