🕒 1 min read
मुंबई : अनेक दिवसांपासून अभिनेता राजकुमार राव आणि गर्लफ्रेंड पत्रलेखा यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर त्यांचा शानदार विवाह सोहळा १५ नोव्हेंबरला संपन्न झाला. पत्रलेखाच्या लेहंगा आणि लालरंगाच्या ओढणी अन् त्यावर लिहिलेल्या ओळीने लग्नसोहळयात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या या ओढणीवर राजकुमारसाठी एक ‘खास’ संदेश देण्यात आला होता.
अलिकडेच राजकुमार राव आणि पत्रलेखा या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. त्यांचा हा विवाह सोहळा चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्टमध्ये लग्नाच्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात पत्रलेखाने लग्नात सप्तपदी घेतेवेळी खास लेहंगा परिधान केला होता. तिच्या या लेहंग्यासोबत तिने परिधान केलेल्या ओढणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावर तिने राजकुमारसाठी एक खास संदेश लिहिला होता.पत्रलेखाने परिधान केलेल्या या ओढणीवर बंगाली भाषेत काही खास ओळी लिहिण्यात आल्या होत्या. या ओळी प्रेमासंबंधित आहेत. ‘अमर पोरन भौरा भालोबाशा अमी तोमर शो मोर पोन कोरिलम,’ अशा ओळी तिच्या ओढणीवर लिहिण्यात आल्या आहेत. ‘मी माझे प्रेमळ हृदय तुझ्याकडे सोपवते,’ असा या शब्दांचा अर्थ होतो.
https://www.instagram.com/p/CWTG_rEpkzq/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा साखरपुडा १३ नोव्हेंबरला पार पडला होता. यानंतर १४ नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्हीही कार्यक्रमांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकुमार राव यांच्या साखरपुड्याच्या दिवशी पांढऱ्या रंगाची थीम ठेवण्यात आली होती. यावेळी त्याने गुडघ्यावर बसून पत्रलेखाला प्रपोज केले आणि अंगठी घातली. अन् १५ नोव्हेंबरला ते दोघेही विवाहबंधनात अडकले. त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग मोदींचे कौतुक करतंय’
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
