🕒 1 min read
मुंबई : कंगनाने एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. यावरुन कंगनावर टीका केली जात आहे. असे असताना कंगनाने केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केलं आहे. यावरून सध्या विक्रम गोखले यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.
अनेक राजकीय नेत्त्यांकडून तसेच कलाकारांनी विक्रम गोखले यांच्या वक्त्यव्याचा निषेध व्यक्त केला आहे. मात्र अभिनेता अतुल कुलकर्णीने केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. अतुल कुलकर्णीने ट्विट करत लिहिले की, ‘ज्येष्ठता आणि शहाणपण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत,’ असं म्हटलं आहे. यावर अनेकांनी हे रिट्विट केलं आहे.अतुल कुलकर्णी यांनी नाव घेता याचा संबंध विक्रम गोखलेंच्या वक्तव्याशी लावला आहे.
Seniority and Wisdom are two different things. #globalphenomenon
— atul kulkarni (@atul_kulkarni) November 15, 2021
काय म्हणाले होते विक्रम गोखले?
विक्रम गोखले म्हणाले होते की, कंगना जे म्हणाली ते खरं आहे, मी त्या वक्तव्याचे समर्थन करतो. कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला.
Absolutely. We saw an example of it a day ago ????#VikramGokhale https://t.co/ejD4e7YDd1
— Abhijit Redkar (@abhijitredkar) November 15, 2021
पुढे ते म्हणाले, अनेक लोक हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी 10 हजार रुपये खर्च करतात. एक माणूस 70 वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का? यावेळी पाठिशी उभे रहायला हवं. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे. मात्र, पक्षासाठी करत असतील तर पाठिंबा नाही, असेही विक्रम गोखले यांनी म्हटले.
विक्रम गोखले तात्यांना समर्पित…!???? https://t.co/aItWCUBBCw
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) November 15, 2021
महत्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ?; अटके पासून अंतरिम दिलासा नाही
- काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार
- आयुष शर्मा इंटिमेट सीन देताना झाला होता अस्वस्थ म्हणाला, “मी लहान मुलासारखा…”
- एअरपोर्ट लूकमुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना बनली टिकाकारांचा निशाणा
- औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गास नितीन गडकरींचा ग्रीन सिग्नल; पाणी पुरवठा योजनेस मिळणार गती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
