Share

‘साखर सम्राटला बदनामीचा शिक्का लागतो तसा शिक्का शिक्षण सम्राटला लागणं योग्य नाही’

Published On: 

🕒 1 min read

नाशिक: नाशिक येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनात मोफत शिक्षण कायद्याची तरतूद खासगी शिक्षण संस्थांना लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

साखर सम्राट म्हणलं की बदनामीचा शिक्का लागतो तसंच शिक्षण सम्राटला बदनामीचा शिक्का लागणं योग्य नाही, असे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ म्हणाले की, काही शिक्षण संस्थामध्ये गैरप्रकार होत असले, तरी सगळ्याच शिक्षण संस्था या वाईट आहेत असे नाही. त्यामुळे शिक्षण सम्राटला साखर सम्राटला लावला जातो तसा बदनामीचा शिक्का लावणं योग्य नसल्याचं ते यावेळी म्हणाले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा यासोबत शिक्षण क्षेत्राला सावरण्याची आवश्यकता आहे. मोफत शिक्षण कायद्याच्या तरतुदीत खासगी शिक्षण संस्थांना तरतूद नसल्याने संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी मोफत शिक्षण कायद्याची तरतूद खासगी शिक्षण संस्थांना लागू करण्यात यावी, अशी मागणी देखील या अधिवेशनात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!