🕒 1 min read
मुंबई : ‘बिग बॉस’ शोची स्पर्धक शेहनाज गिल अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनांतर बरीच चर्चेत आली. सिद्धार्थच्या आठवणीत आजही अनेक चाहते सोशल मीडियावर त्याचे रील्स शेअर करत आहेत. तर दुसरीकडे शेहनाज दु:खातून अद्याप सावरलेली नाही. नुकतच शेहनाज एका चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगीचा एक व्हि़डीओ व्हायरल होत असून यात ती सिद्धार्थच्या आठवणीत रडताना दिसतेय.
दरम्यान शेहनाजचा हा व्हिडीओ पाहून सिडनाजचे चाहते भावूक होत आहेत. या व्हिडीओत शेहनाज ढसाढसा रडताना दिसतेय. हा व्हिडीओ शेहनाजचा सिनेमा ‘हौंसला रख’ च्या प्रमोशनचा आहे. यावेळी तिच्या शेजारी बसलेला दिलजीत दोसांज तिचं सांत्वन करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी शेहनाजचं सांत्वन केलंय. आम्ही तुझ्यासोबत आहोत असं चाहते म्हणाले आहेत.
शेहनाज गिलचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्लाचं जवळपास दोन महिन्यांपूर्वीच निधन झालं. सिद्धार्थ आणि शेहनाज याचं खास नात होतं. दोघं लग्न करणार अशाही चर्चा सुरु होत्या. मात्र यावर दोघांनी शिक्का मोर्तब केलं नव्हत. ‘बिग बॉस’ शोमध्ये शेहनाज आणि सिद्धार्थची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघं काही अल्बममध्येही झळकले होते. दोघांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी पसंती दिली होती. मात्र सिध्दार्थच्या आठवणींना आज ही ती उजाळा देत असतांना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- …त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी- नितीन गडकरी
- प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले- उदयनराजे भोसले
- गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘शिवसेनेसोबत युती…’

