औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवणारे, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून जनसमुदायाला शिवचरित्राची भुरळ पाडणारे बाबासाहेब पुरंदरे. ओजस्वी वाणी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेल्या बाबासाहेबांनी महाराष्ट्रातील प्रत्येक घरांत शिवचरित्र पोहचविले. अवघ्या महाराष्ट्राचे भुषण, पद्मविभूषण, जेष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली या शब्दांमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचारादरम्यान पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. बाबासाहेबांच्या निधानानंतर सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. खा. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारे नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते.
वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा,वाचन,अभ्यास,नवनवीन प्रकल्प, हे सारे नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते.
आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच! pic.twitter.com/5d4D7B9CTQ
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) November 15, 2021
आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच. ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि अवघ्या महाराष्ट्राला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर राज्यातील सर्वच महामंडळाचे कर्मचारी आंदोलने करतील- अजित पवार
- ‘रझा अकादमीचा संस्थापक अध्यक्ष अफगाणिस्थानचा’, नितेश राणेंचा आरोप
- तुम्ही चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणलं होतं; अजित पवारांचे पोलीस अधिकाऱ्यांना खडेबोल
- ‘माझ्या सिनेमात हिंदू खलनायक दाखवले गेले तेव्हा…’ रोहित शेट्टीचा सवाल
- मोदींच्या विरोधात सक्षम चेहरा नाही असं म्हणता येणार नाही- शरद पवार


