Share

पुरंदरेंच्या निधनामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड-एकनाथ खडसे

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज (१५ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू असून ते १०० वर्षांचे होते. शिवशहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

याबाबत एकनाथ खडसे यांनी ट्विट केले. ते म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!