Share

शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असले तरी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच  राज्यभरात सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला आता भाजपनेही जाहीर पाठींबा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे.

शेवटी असं आहे की ज्याचं जळतं त्याला कळतं. प्रवाशांची जी अडवणूक होत आहे पण त्याचा त्यांनी विचार करायचा. त्याची चूल पेटणं मुश्कील आहे त्याने विचार करायचा? सरकारने विचार करायला पाहिजे. तुम्ही बसवा त्यांना चर्चा करा. सरकारी कर्मचारी तुम्हाला म्हणण्यात थोडा वेळ लागेल असं सांगा, थकीत पगार द्या, बोनस द्या एसटी सुरू होतील. चर्चा सुरू राहील समिती नेमा. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते सरकार यांची एक समिती नेमा, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला यावेळी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बोलणं हे जर राजकारण असेल तर आम्ही ते करणार. महिलांवर होणाऱ्या अन्याया विरोधात बोलणं हे राजकारण असेल तर आम्ही ते करणार. नवाब मलिकांच्या विरोधात बोलणं हे जर राजकारण असेल तर आम्ही ते करणार. ज्याप्रकारे ड्रग्जला संरक्षण देऊन तरूण पिढीचं नुकसान करणं सुरू आहे, त्याविरोधात आम्ही बोललो तर राजकारण होणार असेल तर ते आम्ही करणार. आम्ही विरोधी पक्ष आहोत, विरोधी पक्षाचं हेच काम आहे. की ज्यामुळे लोकाशाहीमध्ये वर्तमानपत्र असतील, न्यायालय असतील, विरोधी पक्ष असेल या सगळ्यांमुळे सरकार ठिकाणावर राहतं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!