Share

‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचं सडेतोड उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर केला. त्यानंतर नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मलिकांना बिगडे नवाब असं म्हंटल. बिगडे नवाब म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी उत्तर दिलं आहे.

जर आपल्याकडे काही लपवण्यासारखं नसेल तर त्यांना पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असतं तेव्हा तिथे भीती नसते. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच एकमेव आमचा अजेंडा आहे, असं उत्तर देत निलोफर यांनी अमृता फडणवीसांच्या ट्वीटला दिलं आहे.

बिघडलेल्या नवाबांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतल्या. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!, असं अमृता फडणवीसांनी म्हणाल्या आहेत. अमृता फडणवीसांच्या याच ट्वीटला रिट्वीट करत निलोफर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!