Share

‘आपल्या जावयाची काळी आणि बेनामी संपत्ती वाचवण्यासाठी ते दुसऱ्यांवर आरोप करतात’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर केला. त्यानंतर नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं बनावट नोटांचा खेळ सुरु होता, १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या सर्व प्रकरणावरुन आता भाजपकडून मलिकांवर टीकेची झोड उठत आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मलिकांना उत्तर दिलं आहे.

बिगडे नवाबने पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद बोलावल्या. पण प्रत्येक वेळी खोटं आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी आम्हाला ऐकवल्या. त्यांचं एकच लक्ष्य आहे आपल्या जावयाची बेनामी आणि काळी संपत्ती वाचवण्यासाठी नवाब मलिक लोकांवर आरोप करत आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सर्वप्रथम हल्लाबोल केला होता. तेव्हापासून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीनं केलेल्या कथित बनावट कारवाया मलिक यांनी उजेडात आणल्या. त्यानंतर भाजप वानखेडेंच्या बाजूनं मैदानात उतरला. मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंच ते प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप करत असल्याचं भाजपनं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!