🕒 1 min read
मुंबई: राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचले आहे. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत, त्यामुळे आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा होत आहे. दरम्यान आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आज एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ४० एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेतलेले हे बेशरम राज्य सरकार त्या मोर्चाला सामोरे जाण्याचे सौजन्य दाखवेल का? मुख्यमंत्री तर घर सोडणार नाहीत तर किमान परिवहनमंत्री तरी धाडस दाखवतील का? असा सवल करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आज एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे ४० एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेतलेले हे बेशरम राज्य सरकार त्या मोर्च्याला सामोरे जाण्याचे सौजन्य दाखवेल का? मुख्यमंत्री तर घर सोडणार नाहीत तर किमान परिवहनमंत्री तरी धाडस दाखवतील का? pic.twitter.com/eH5PWu6YVz— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 10, 2021
दरम्यान मुंबई मंत्रालय येथे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पोलिसांनी अडवले आहे. मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर मानखुर्द चेकपोस्ट येथे पोलीस बंदोबस्त लावून एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे. याचाच निषेध व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत मानखुर्द जकात नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- झीलंडविरुद्ध टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा भूषविणार कर्णधारपद
- T20 WC: आज रंगणार उपांत्य फेरी; इंग्लंडपुढे न्यूझीलंडचे आव्हान
- रोहित-द्रविड जोडी टीम इंडियाला नव्या शिखरावर नेईल- रवी शास्त्री
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ‘या’ दिग्गज खेळाडूंना ठेवले संघाबाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
