Share

एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, मात्र पोलिसांकडून अडवणूक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचले आहे. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत, त्यामुळे आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा होत आहे.

मात्र मुंबई मंत्रालय येथे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पोलिसांनी अडवले आहे. मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर मानखुर्द चेकपोस्ट येथे पोलीस बंदोबस्त लावून एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे. याचाच निषेध व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत मानखुर्द जकात नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारत ३७६ संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई केली आहे. तर राज्यातील ४५ डेपोतील ३७६ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!