🕒 1 min read
अहमदनगर : नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह चारजणांना निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन स्टाफ नर्सची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, डॉ. विशाखा शिंदे, स्टाफ नर्स सपना पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, स्टाफ नर्स अस्मा शेख आणि चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली तसेच पत्रकार परिषद घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. सोमवारी अखेर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयातील आगीनंतर बेपर्वाई दाखवल्याबद्दल जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, नर्स आस्मा शेख व चन्ना आनंत यांना निलंबित केले आहे.
1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित
2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित
4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित
5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त
6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त
2/2— Rajesh Tope (@rajeshtope11) November 8, 2021
या कारवाईनंतर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, आगीच्या घटनेनंतर मी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी मला वेगळी माहिती सांगण्यात आली होती, आज मला नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक व नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सीसीटीव्ही फुटेजचा अहवाल दिला, त्यानंतर मी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. आग कशामुळे लागली ? या कारणाचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून पाच दिवसांत त्याचा अहवाल येणार आहे. कदाचित महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण कंपनीचे जबाबदार असणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’, राऊतांचे टीकास्त्र
- भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

