औरंगाबाद : गावच्या विकासासाठी विविध योजना, संकल्पना प्रभावीपणे राबवणाऱ्या राज्यातील पाच महिला सरपंचांना ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येईल, अशी घाेषणा ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी साेमवारी केली. येत्या सहा महिन्यांत राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर हे पुरस्कार दिले जातील. मूल्यमापन समितीच्या माध्यमातून त्यांची निवड केली जाईल, असेही ते म्हणाले. औरंगाबादेत आयोजित महिला सरपंच परिषदेत सत्तारांनी ही माहिती दिली.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन झाले, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी सत्तार म्हणाले, ‘आपल्याकडे ५० टक्के महिला सरपंच आहेत. विकासाचे व्हिजन महिलांकडे आहे. त्यांना संधी मिळायला हवी. विकासकामे करताना अडचणी येत असेल तर त्या सरकारला सांगा. ग्रामसेवकांना गावात राहण्यासाठी सक्ती करा. काम न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करायची असेल तर तशी शिफारस सरकारकडे करावी.’
ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि जिल्हा पातळीवर आदर्श महिला सरपंच पुरस्काराचे वितरण केले जाईल. या पुरस्काराचे नाव स्व. मीनाताई ठाकरे आदर्श महिला सरपंच पुरस्कार असे असेल. पहिला पुरस्कार २५ लाख रुपये रोख रकमेचा असेल. तसेच आणखी पाच जणांना आदर्श सरपंचाचा पुरस्कार देण्यात येईल. येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती सत्तार यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’, राऊतांचे टीकास्त्र
- भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

