Share

भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ : अहमदनगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीची दुर्घटना ताजी असतानाच आता अजून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातल्या भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयातल्या लहान मुलांच्या कक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत आत्तापर्यंत ४ मुलांचा मृत्यू झाला असून ३६ मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान,या दुर्दैवी घटनेबद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की,’या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र प्रकृती गंभीर असलेल्या बालकांचा जीव वाचवता आला नसल्याची खंत आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!