🕒 1 min read
नवी-दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका पोस्टमुळे सध्या राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. हे सांगताना त्यांनी मागील वर्षभरात बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले आणि अनपेक्षित पावलंही उचलल्याचं कबूल केले आहे.
अमोल यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्यावर ‘सिंहावलोकनाची वेळ. गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलंही उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल, पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन’, असे कॅक्शन दिले आहे.
https://www.instagram.com/p/CV-E_9mLIfU/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू. नव्या जोमाने, नव्या जोशाने, असेही अमोल यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. विशेष म्हणजे चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, असे म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
- …या संशोधनातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत- संजय राऊत
- ‘वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा’, संदीप देशपांडेंनी पोस्ट केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
