Share

‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक झाली. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर इतर नेत्यांचा नंबर आला आहे, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत हा आरोप केला आहे.

अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर हा इतर लाभार्थ्यांचा क्रमांक लागणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. या लाभार्थ्यांमध्ये अनिल देशमुख यांचा मुलगा, जावई, भागीदार यांचा समावेश आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या वसुलीचा ओघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि अनिल परब यांच्यासारख्या नेत्यांपर्यंत गेला असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. ऋषीकेश यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले असून देशमुख आणि ऋषीकेश यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!