🕒 1 min read
नवी-दिल्ली : आज(१ नोव्हें.) एका जाहीर सभेला संबोधित करतांना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ‘भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील’, असे ओवैसी म्हणाले आहे.
यावेळी बोलत असतांना ओवैसी म्हणाले की,’२०१४ ची लोकसभा निवडणूक झाली, एमआयएम लढली नाही तरी पण मग भाजपा कशी काय जिंकली. २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. एमआयएम २५-२७ जागांवर आणि भाजपा ३०० जागांवर यशस्वी झाली. कोण जबाबदार? त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये एमआयएम लढली नाही. सपा आणि बसपा एकत्र लढले, केवळ १५ जागांवर यश मिळवलं. मग सांगा त्या सगळ्या जागांवर भाजपा कशी काय जिंकली?’
भारत में कभी मुस्लिम वोट बैंक नहीं था और ना रहेगा, हमेशा से हिन्दू वोट बैंक था, है और रहेगा।pic.twitter.com/7l2sgD8ELp
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) November 1, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’माझ्या मित्रांनो भारतीय राजकारणात तुमचे एवढे महत्व राहिलेले नाही. तुमच्या मताचे, मुस्लिमांच्या मताचे आता एवढे महत्व राहिलेले नाही. आपल्या डोळ्यात नेहमीच धुळफेक करण्यात आली की, मुसलमान एक व्होट बँक आहे. मी संसदेत उभा राहून ही गोष्ट सांगितली होती की, भारतात मस्लीम व्होट बँक राहणार नाही. भारतात नेहमीच हिंदू व्होट बँक होती, आहे आणि राहील. तसेच जर कुणी विचारलं की तुम्ही असं कसं काय म्हणत आहात? व्होट बँकेचे राजकारण, व्होट बँकेचे राजकारण…नेहमी बोललं जातं की मुस्लीम व्होट, मुस्लीम व्होट कुठंय मुस्लीम व्होट? जर मुस्लीम मतं असती तर भारताच्या संसदेत केवळ २३-२४ खासदारच का जिंकून आले असते? नेहमीच या देशात कोणतीच मुस्लीम व्होट बँक नव्हती,’ असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मलिकांनी लवंगी फटाका लावलाय, आता दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार- देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा खेळ सुरु’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
- ‘नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, लवकरच शरद पवारांना पुरावे देणार’, फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘चोराच्या उलट्या बोंबा; विनाशकाले विपरीत बुद्धी’, अमृता फडणवीसांचे मलिकांना प्रत्युत्तर
- जास्त बोललात तर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू- नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
