Share

‘अजित पवार यांच्याकडे हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती’, सोमय्यांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांकडे हजार कोटी रुपयांची बेनाम संपत्ती आहे. त्याचा त्यांनी हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी केलीय. मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या यांनी पवार कुटुंबावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केलेत.

आपण दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडणार आहोत असे सोमय्या यांनी जाहीर केले होते. परंतू, आज सकाळी नवाब मलिक यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील ड्रग्ज कारभाराचे मास्टर माइंड म्हणत टीका केल्याने आपण आजच बॉम्ब फोडल्याचे स्पष्टीकरण सोमय्या यांनी दिले. ‘अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप केवळ ठाकरे-पवारच करू शकतात. ती नवाब मलिकांची कॅपेसिटी नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

अजित पवारांनी १ हजार ५० कोटीची बेनामी संपत्ती कशी जमवली? पवार कुटुंबांच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले आणि कसे गेले? याचे उत्तर ठाकरे पवारांना द्यावे लागेल. या सहा फटक्यांपैकी पहिला फटका मी फोडला आहे. हिंमत असेल तर ठाकरे पवारांनी यावर उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. आम्ही तसा आरोप केला होता. ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईतून हे सिद्ध झालेय. या प्रकारावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जातेय. केवळ लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे नाटक सुरू आहे. १९ दिवस ईडीची धाड सुरू आहे हे अजित पवारांनी सांगांवं, असं आव्हान सोमय्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!