🕒 1 min read
मुंबई : देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. पण त्यासोबतच नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोपही फडणवीसांनी केला आहे.
‘नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे’ असे फडणवीस यांनी सांगितले.
यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘मल्लिकांचे ‘अंडर वर्ल्ड’ शी संबंध आहेत याची माहिती तुम्ही शरद पवारांना देणार? चक्क शरद पवारांना?’ असे ट्विट दमानिया यांनी केले आहे. दरम्यान दमानिया यांनी असे ट्विट का केले याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीये. मात्र, राजकीय वर्तुळात आरपो करताना शरद पवारांचे नाव अनेकांशी जोडण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर दमानिया यांचे ट्विट बरेच काही सांगून जातेय.
मल्लिकांचे 'अंडर वर्ल्ड' शी संबंध आहेत याची माहिती तुम्ही शरद पवारांना देणार? चक्क शरद पवारांना?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 1, 2021
तर दुसरीकडे, नवाब मलिक आपण काहीतरी मोठा गौप्यस्फोट केल्याचा आव आणत आहेत. मात्र, त्यांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय. पण मी दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब फोडणार. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असणारे संबंध मी पुराव्यानिशी समोर आणेन. देवेंद्र फडणवीस हा पुराव्याशिवाय आरोप करत नाही. आजपर्यंत एकदा केलेला आरोप मला कधीही मागे घेण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नवाब मलिकांनी सुरु केलेल्या या खेळाचा शेवट आता मी करणार. मी काचेच्या घरात राहत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मलिकांनी लवंगी फटाका लावलाय, आता दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार- देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा खेळ सुरु’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
- ‘नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, लवकरच शरद पवारांना पुरावे देणार’, फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘चोराच्या उलट्या बोंबा; विनाशकाले विपरीत बुद्धी’, अमृता फडणवीसांचे मलिकांना प्रत्युत्तर
- जास्त बोललात तर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू- नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

