🕒 1 min read
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी भाजप आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग माफियांशी संबंध असून ते त्यांना संरक्षण देतात, हा सगळा खेळ त्यांच्या इशाऱ्यावर चालतो असा आरोप नवाब मलिकांनी केला होता.
शिवसेना-भाजप सरकारच्या काळात नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा दूत म्हणून काम करत होता. पोलिसांच्या बदल्यांपासून ते मंत्रालयातील कामे मार्गी लावण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. एवढेच नव्हे तर शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नीरज गुंडे मातोश्रीवर निरोप घेऊन जायचा, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आता पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. जर कुणाच्या सोबत फोटो काढल्याने पक्षाचा ड्रगशी संबध येत असेल तर ज्या पक्षाच्या मंत्र्यांच्या घरात ड्रग सापडतात तो पक्ष तर ड्रग माफियाच ठरतो. त्यांचे सगळे आरोप हास्यास्पद असून आता पुराव्यानिशी मोठा बॉम्ब मी फोडेन, असं फडणवीस यांनी म्हटलंय. नवाब मालिकांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले सबंध मी तुम्हालाही आणि शरद पवरांनाही देईन, असाही दावा त्यांनी केला आहे.
मला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी कोणाच्याही मांडवलीची गरज लागत नाही. उद्धव ठाकरे आणि मी मांडवली नव्हे तर चर्चा करायचो. नवाब मलिक यांच्यासारखे लोक मांडवली करतात अशी टीकाही त्यांनी केली. नीरज गुंडे याच्याशी माझे संबंध आहेत, ते नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण नीरज गुंडे हे माझ्यापेक्षा जास्तवेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. मी नीरज गुंडे यांच्या घरी जायचो. पण यापूर्वी उद्धव ठाकरेही माझ्यापेक्षा जास्तवेळा त्यांच्या घरी गेले आहेत. एवढेच नव्हे तर नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्तवेळा मातोश्रीवर गेले असतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मलिकांनी लवंगी फटाका लावलाय, आता दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार- देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा खेळ सुरु’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
- ‘नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, लवकरच शरद पवारांना पुरावे देणार’, फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘चोराच्या उलट्या बोंबा; विनाशकाले विपरीत बुद्धी’, अमृता फडणवीसांचे मलिकांना प्रत्युत्तर
- जास्त बोललात तर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू- नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

