पुणे : राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुणे महापालिकेसाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे नेते जोरदार तयारीला लागल्याचं दिसून येत आहे. बैठका आणि मेळाव्याचं सत्र सुरु झालं आहे. यावेळी शिवसंग्राम पक्षही निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी घोषणा केली आहे.
पुण्यात पुढचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार. अजितदादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नोकरी मेळावा आज पुण्यात घेण्यात आला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पत्रकार सांगतात की पुण्यातील लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केलं, पण महापौरांकडून चांगलं काम झालं नाही. येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल, असं लोक सांगत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजितदादांकडून काम करुन घ्या, निवडणुकीच्या कामाला लागा. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल. प्रचार सुरु करा, असा आदेश सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात विनायक मेटेंची एन्ट्री; स्वबळावर की भाजपसोबत?
- त्या मुलाकडे काहीच सापडलं नाही मग त्याला एवढे दिवस अटक का?; आर्यन खान प्रकरणी सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- कोर्टात जा, पण बदनामी करू नका; ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिकांना सल्ला
- शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या ‘या’ 10 नगरसेवकावर मोठी कारवाई!
- ‘सोमय्यांची पोकळ धमकी, मीच अधिवेशनात पोलखोल करणार, भाजप नेते तोंड लपवून पळतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

