मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले. त्यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेंडेंच्या पत्नी आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.
मलिक हे खूप मोठे नेते आहेत. ते रोज नवा आरोप करत आहेत. काही कागदपत्रंही दाखवत आहेत. मात्र, त्यांचे सर्व दावे आणि पुरावे खोटे आहेत. त्यात काही तथ्य नाही, असा दावा अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केला आहे. क्रांती रेडकर यांनी सासरे ज्ञानदेव वानखेडे यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापर्यंत एनसीसी आणि सर्व्हिसला लागल्यापासूनचे सर्व कागदपत्रं आमच्याकडे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे. मी मुस्लिम महिलेशी 1978 मध्ये लग्न केलं आहे. मी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी आंबेडकरवादी, जयभीमवाला आहे. महार जातीचा आहे. मला त्याचा मला अभिमान आहे. आमच्यावरील खासगी आरोप थांबवा. प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. तुमच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला बदनाम करू नये. तुम्ही कोर्टात जावं आमची बदनामी करू नका, असं ज्ञानदेव वानखेडे सांगितलं आहे.
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही आला आहे. आम्ही दलितांचे हक्क हिरावले नाही. मी आंबेडकरवादी आहे. तुम्ही आमच्यावर निराधार आरोप करू नका, असं आवाहन करतानाच वानखेडे यांनी सर्व कागदपत्रे माध्यमांसमोर सादर केली.
रामदास आठवले आम्हाला भेटले हे कुणाला दुर्देवाचं वाटत असेल तर आम्ही जायचं कुठे? एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहणं चुकीचं आहे का? आम्ही आठवलेंना सर्व कागदपत्रं दिली आहेत. नवाब मलिक मीडियासमोर काही कागदपत्रं दाखवत असतील आणि तुम्ही तेच सत्य मानत असाल तर कृपया डोळे उघडा. माझी हातजोडून विनंती आहे, असं क्रांती रेडकर म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या ‘या’ 10 नगरसेवकावर मोठी कारवाई!
- ‘सोमय्यांची पोकळ धमकी, मीच अधिवेशनात पोलखोल करणार, भाजप नेते तोंड लपवून पळतील’
- दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार; किरीट सोमय्यांची महाविकास आघाडीला इशारा
- राज्यात वीजटंचाई होणार नाही, वेळ पडली तर सेंट्रल ग्रील्डमधून वीज देणार; रावसाहेब दानवेंचा विश्वास
- माचीसची काडी महागली! दिवाळी आली, महागाईचे काय करणार?; राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

