Share

त्या मुलाकडे काहीच सापडलं नाही मग त्याला एवढे दिवस अटक का?; आर्यन खान प्रकरणी सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Published On: 

पुणे : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी गेली 26 दिवस अटकेत होता. त्याच्या अटकेनंतर राज्यातील राजकारणात अनेक वाद झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझ पार्टीवर छापा मारणाऱ्या एनसीबीच्या अधिकारी समीर वानखेडेंना चांगलंच धारेवर धरलं होतं. हे प्रकरण आर्यन खान किंवा ड्रग्ज प्रकरण असं राहिलं नसून समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मुस्लिम हा नविन वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या.

मी एक आई म्हणून कोणत्याही आईसाठी हा खूप दुखाचा विषय आहे. कोणत्याही कुटुंबात असं झालं तर ते दुर्दैवी आहे. तुम्हा सर्वांच्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीवरुन त्या मुलाकडे काहीच सापडलं नाही. मग तरीही त्याला 26 दिवस का अटक केली?, एखाद्या मुलाकडे काहीही सापडलं नाही आणि त्याला 26 दिवस न्यायलयीन कोठडी करत असाल तर हा कुठला न्याय आहे?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

आपण समाज म्हणून याचं चिंतन केलं पाहिजे. कोणाचाही मुलगा असो त्याच्यावर अन्याय झाला असेल तर याचं उत्तर केंद्र सरकारने द्यायला हवं. मीडिया ट्रायल कोणाची होऊ नये. अटलजींच्या काळात जो काय कायदा झाला होता, ड्रग्ज तर फार पुढची गोष्ट आहे. मी तर तंबाखु, गुटखाच्या विरोधात आंदोलन करते. त्यामुळे अशा कोणत्याही पदार्थामुळे समाजात मुलांना रिहॅबील हा महत्वाचा असतो फक्त जेल हा मार्ग नसतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!