पुणे : महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. यामध्ये पुणे पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने उडी घेतली आहे.
ही निवडणूक स्वतंत्र्यरित्या लढवावी की भाजपशी हातमिळवणी करावी यावरुसुद्धा आज निर्णय घेतला जाणार आहे. मेटे यांनी पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पुण्यात राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शिवसंग्रामच्या उद्या होणाऱ्या मेळाव्यात आता काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोरोना नियम शिथिल होताच राज्यात वेगवेगळ्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सहकारी संस्था, जिल्हा बँका, पोटनिवडणुका अशा अनेक प्रकारच्या निवडणुका राज्यात होत आहेत. तर आगामी काळात राज्यातील प्रमुख शहरांच्या पालिका निवडणुकादेखील येऊ घातल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही पुणे महानगरपालिकेची रंगली आहे.
पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने योजना आखत आहे. याच पार्श्वभूमीवर विनायक मेटेंचा शिवसंग्राम ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे. आज पुण्यात शिवसंग्रामचा पदाधिकारी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विनायक मेटे आपली भूमिका आणि निर्णय जाहीर करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- त्या मुलाकडे काहीच सापडलं नाही मग त्याला एवढे दिवस अटक का?; आर्यन खान प्रकरणी सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- कोर्टात जा, पण बदनामी करू नका; ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिकांना सल्ला
- शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या ‘या’ 10 नगरसेवकावर मोठी कारवाई!
- ‘सोमय्यांची पोकळ धमकी, मीच अधिवेशनात पोलखोल करणार, भाजप नेते तोंड लपवून पळतील’
- दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार; किरीट सोमय्यांची महाविकास आघाडीला इशारा


