Share

शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या ‘या’ 10 नगरसेवकावर मोठी कारवाई!

Published On: 

सातारा : माथेरान येथे राजकीय उलथा पालथ झाली आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे माथेरानचे राजकारण चांगलेच तापले होते. याच दहा नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मोठा दणका दिला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेलेल्या माथेरान नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मोठा दणका दिला. भाजपवासी झालेल्या या दहाही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिला आहे. माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला आहे.

माथेरान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथस आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे या दहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी अपात्र घोषित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!