Share

नवविवाहित आयुषी आणि सुयश टिळक यांच्या देवदर्शनाची जोरदार चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे हे काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या आधीपासूनच त्यांचे संगीत, मेहेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर नुसते धुमाकूळ घालत होते. सर्वत्र केवळ सुयश आणि आयुषी यांच्या लग्नाच्या चर्चा चालू होत्या. काही महिन्यांपूर्वी आयुषी आणि सुयश यांचा साखरपुडा झाला होता. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली होती. अशातच टिळक जोडप्याने देवदर्शन घेतले आहे. देवदर्शनाचे काही फोटो सुयश आणि आयुषी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकतेच सुयशने इंस्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. ते दोघेही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. या फोटोमध्ये आपण बघू शकतो की, आयुषीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे, तर सुयशने निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. महालक्ष्मीच्या मंदिरा बाहेर उभे राहून त्यांनी हे फोटो काढले आहे. दोघांनीही कपाळाला गुलाल लावला आहे. तसेच खांद्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र घेतले आहे. तसेच आयुषीने गळ्यात मंगळसूत्र आणि नाकात नथ घातली आहे. ती अगदी नव्या नवरीच्या वेशभूषेत दिसत आहे.

या फोटो ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं, श्री अंबाबाई, महालक्ष्मी कोल्हापूर.’असे नमूद केल्याने अनेकजन प्रतिक्रिया देत आहेत. तसेच त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत, तर काहीजण त्यांच्या या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत. सुयश आणि आयुषीने त्यांच्या नात्याबाबत खूप गुप्तता पाळली होती. त्यांनी अचानक साखरपुडा करून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्या दोघांनी आयुषीच्या वाढदिवशी त्यांचा साखरपुडा केला होता. साखरपुड्याच्या वेळेस जोडप्याने साऊथ इंडियन लूक केला होता, तर लग्नाच्या वेळेस दोघेही अस्सल मराठमोळ्या लूकमध्ये दिसत होते. आता देवदर्शनाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!