🕒 1 min read
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तुम्हा ग्रामस्थांना रस्ता दाखविला. आम्हालाही दाखविला. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हजारे यांनी रस्ता दाखविला. त्यामुळेच मोदींनी हजारे यांच्या अनेक संकल्पना स्वीकारल्या आहेत, असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपण सर्वप्रथम हजारे यांना वंदन करीत असल्याचे सांगितले.
नगरच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल कोश्यारी यांनी गुरुवारी राळेगणसिद्धीस भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. हजारे यांनी त्यांना विविध विकासकामांची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना कोश्यारी यांनी हजारे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, अण्णा हजारे यांना प्रणाम म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरालाच प्रणाम म्हणावा लागेल. हजारे यांनी ग्रामस्थांना, देशाला आणि आम्हाला रस्ता दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही रस्ता दाखवला. हजारे यांनी राबवलेला सौरऊर्जा प्रकल्प प्रंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर राबवत आहेत.
हजारे यांना अभिप्रेत असलेल्या अनेक योजना पंतप्रधान राबवत आहेत. संपूर्ण देशातील जनता राळेगणसिद्धीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवत आहे. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ग्रामस्थ अतिशय चांगले काम करत आहात. असेच काम करत राहा. लवकरच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही राळेगणसिद्धीला घेऊन येईन, अशी ग्वाही कोश्यारी यांनी या वेळी हजारे यांना दिली.
यावेळी अण्णांनी महत्वाच्या तीन ग्रामविकासाला महत्वपूर्ण ठरलेल्या तीन प्रयोगांची माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देत त्यावर राज्य आणि देश पातळीवर अमलबाजवणी गरजेची असल्याचे सांगितले. सदोष नालाबंडीग ऐवजी शास्त्रशुद्ध नालाबंडीगची निर्मिती, दूध, फळ-भाजीपाला अशा पूरक शेती उद्योगांची निर्मिती आणि सोलर प्रकल्पाची गरज आणि सोलर ऊर्जानिर्मिती यावर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. देशात अनेक प्रशिक्षण केंद्र आहेत पण नेतृत्व निर्माण करणारे प्रशिक्षण केंद्र नाहीत, त्याची खरी गरज असल्याचे अण्णांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. राज्यपालांनीही अण्णांनी राबवलेले प्रयोग आणि नेतृत्व निर्माण करणारी प्रशिक्षण केंद्र यावर जरूर विचार करून वर पातळीवर चर्चा करू असे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-पाकिस्तान अंतिम सामना व्हावा; पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताकची इच्छा
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- मार्क झुकरबर्गची मोठी घोषणा; ‘फेसबुक’चे नाव बदलून ठेवले ‘हे’ नवे नाव
- 20 World Cup अफगाणिस्तान-पाकिस्तान सामना रंगणार आज
- हायकोर्टाकडून समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर नोटीस द्यावी लागणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
