Share

तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; वानखेडे प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रुझ ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा  आर्यन खानला अटक केल्यापासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवरती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांसह खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. वानखेडेंनी बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याच्याचा आरोप करत त्यांनी खंडणी मागितल्याचाही आरोप केले आहेत.

आज समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपणाला जीवे मारण्याच्या लटकवण्याच्या धमक्या येत असल्याचा खुलासा त्यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

तुम्ही कितीही धमक्या दिल्या अपमान केला, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं पत्नीला शिव्या दिल्या बहिणीवर आरोप केले. एवढंच नव्हे तर तुम्ही त्याचा जात धर्म देखील काढलात तरीही तो डगमगला नाही. कर्तव्य बजावत राहीला ‘तुम्ही करा रे कितीही हल्ला लय मजबूत भिमाचा किल्ला’, अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंचं जाहीर समर्थन केलं आहे.

दरम्यान, प्रकरणातून माझे पती बाहेर पडणारच ते प्रामाणिक अधिकारी आहेत शेवटी सत्याचाच विजय होणार, असा विश्वास क्रांती रेडकर यांनी व्यक्त केला. तसंच विरोधकांना वेळच उत्तर देईल असही त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!