Share

‘सुभाष साबणे यांना निवडून देऊन ताळ्यावर नसलेल्या राज्य सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका’

Published On: 

🕒 1 min read

देगलूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देगलूर-बिलोली विधानसभा पोट-निवडणुकीसाठी शेवटची सभा काल देगलूर येथे झाली. यावेळी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली. यावेळी बोलताना मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम या सरकारने बंद केले, वैधानिक विकास मंडळं बंद करून मराठवाड्याची कवच-कुंडलं काढून घेतली. हा मराठवाड्याच्या विकासाचा खून आहे अशी टीका देखील फडणवीस यांनी केली.

फडणवीस म्हणाले, विम्याचा राज्य सरकारचा हिस्साच मविआ सरकारने भरला नाही. त्यामुळे आज शेतकर्‍यांच्या डोळ्यात केवळ अश्रू आहेत. कोरोना काळात राज्य सरकारने एकाही घटकाला मदत नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. केंद्राने दिलेले गरिबांसाठीचे अन्नही यांनी सडविले. विकास-विरोधी, जन-विरोधी हे सरकार केवळ आणि केवळ लोकांच्या हक्काचे पैसे लुबाडण्यात व्यस्त आहे. सुभाष साबणे यांना निवडून देऊन ताळ्यावर नसलेल्या या सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका

यावेळी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, खा. प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, सुभाष साबणे, राम शिंदे आणि इतर उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले,राज्यातील सरकारची 2 वर्षांतील उपलब्धी काय? जलयुक्त शिवार बंद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बंद, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद, स्मार्ट योजना बंद, ड्रीप इरिगेशन बंद, रस्त्यांची कामे बंद, धरणांची कामे बंद, शेतकर्‍यांच्या विमा, वीज बंद, शेतकर्‍यांना मदत बंद, राज्यात केवळ बंद सरकार आहे. या सरकारने केला तो फक्त भ्रष्टाचार केवळ छपाईचा आणि खाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू, हा एकमात्र कार्यक्रम सुरू या खाण्याचा हिशेब सुद्धा संगणकावर ठेवला आहे. महाराष्ट्रातील जनताच यांना धडा शिकवेल असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!