Share

वानखेडे आल्यापासून एनसीबीतील चार अधिकाऱ्यांचे झाले निलंबित!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : समीर वानखेडे एनसीबीचे विभागीय संचालक झाल्यापासून एनसीबीतील चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आलेल्या निनावी पत्रात नमुद आहे. मी एनसीबीत असल्याने माझ्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याने नाव उघड करू शकत नाही, असे या पत्रात म्हंटले आहे.

या पत्रात समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून वानखेडेंची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. वानखेडे यांनी मुंबईत जितक्या कारवाया केल्या त्यात पकडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळपास २५ कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या आहेत. तसेच मर्जीप्रमाणे पंचनामे केले जातात, हे पंचनामे व सह्या केलेले कोरे कागद एनसीबीच्या कार्यालयात सापडतील, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली कशी झाली, याचा खुलासाही या पत्रात केला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास एनसीबीकडे सोपविण्यात आल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन संचालक राकेश अस्थाना यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सांगून वानखेडे यांची विभागीय संचालक पदी नेमणुक केली होती. बॉलिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून वसुली करण्याचे काम समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना दिले गेले होते.

गुन्हे दाखल होताच कोट्यवधी रुपये वसुली केली गेली. त्यातील वाटा राकेश अस्थाना यांनाही मिळाला होता. दीपिका पादुकोन, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल यांच्याकडून पैसे घेतले गेले. अयाज खान नामक वकिलाने ही खंडणी वसुल केली होती्. हा अयाज खान समीर वानखेडे यांच्या वतीने बॉलिवूडमधून पैसे गोळा करतो.

एनसीबी कार्यालयात त्याचा मुक्त वावर असतो. खंडणी गोळा करून देण्याच्या बदल्यात समीर वानखेडे अयाज खानला बॉलिवूड कलाकारांचे वकीलपत्र मिळवून देतो, असा आरोप मलिक यांनी या पत्राच्या आधारे केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!