Share

नोकरीबाबत सल्ला घेण्यासाठी वडिलांनी शरद पवारांकडे नेलं होतं- दिलीप वळसे पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांच्या वडिलांनी नोकरी कुठे करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे घेऊन गेले होते. एका मुलखतीत बोलताना वळसे पाटलांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

पदवी घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी करावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी ते मला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडेही घेऊन गेले होते. परंतु, नोकरी करण्यापेक्षा राजकारणात जावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे १९८१ ते १९८८ या कालावधीत शरद पवारांचा स्वीय सचिव काम पाहिले. त्यामुळे अनेकांचा सहवास लाभला. ओळखी वाढल्या, अशी आठवण दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितली.

शालेय शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी मुंबईत आलो. येथे येऊन कायद्याची पदवी घेतली. तसेच जर्नालिझमचा डिप्लोमा केला, असे दिलीप-वळसे पाटील यांनी सुरुवातीच्या शिक्षणाबद्दल सांगितले.

माझे वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील १९६७ ते १९७२ या कालावधी आमदार होते. वडिलांना त्यांच्या कामात मदत करायचो. तेव्हा नववी इयत्तेत असेन. वडील घरात असताना राजकीय चर्चा व्हायच्या. त्या अनेक गोष्टी कानावर यायच्या. त्यामुळे घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यानंतर राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्यावर वडिलांच्याच मतदारसंघात काम करण्याचा निर्णय घेतला. अधिक चांगला विकास करण्याचे ठरवले, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!