औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचे जीव गेले, ५० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार मराठवाड्यात फिरकलेदेखील नाहीत. यापूर्वी ५० हजार हेक्टरी मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता ही मदत देऊन दाखवावी, असे आव्हान माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पीक विम्याची रक्कम मिळावी या मागणीसाठी किसान मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘मातोश्रीचा पोपट काय म्हणतोय, शेतकऱ्यांना मदत नाय म्हणतोय’, ‘बारामतीचा पोपट काय म्हणतोय, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना भेटायचे नाय म्हणतोय’, ‘हेक्टरी पन्नास हजार मदत मिळालीच पाहिजे,’ अशा घाेषणा देण्यात आल्या.
हरिभाऊ बागडे म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी बीड जिल्ह्यात जाऊन तेथील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली होती. अजित पवार यांनीही हीच मागणी केली होती. आता ठाकरे मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची ही मागणी पूर्ण केली पाहिजे. तसे न करता वीज बिलासाठी डीपी बंद करून सरकार शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे, असा आरोप बागडेंनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीवर नाराज अन् भाजपवर खुश असं काही नाही; जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझं धोरण’
- ‘..याचा अर्थ लसींसाठी महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती’, भाजपची टीका
- ‘नितीन राऊतांनी माफी मागावी अन्यथा मुख्यमंत्री ठाकरेंनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा’
- भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस मंत्री नितीन राऊत बॅकफुटवर, ‘ती’ वादग्रस्त पोस्ट केली डिलीट
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
