Share

‘आर्यन खान आणि नवाब मलिक हे दोन वेगळे विषय’, गृहमंत्री वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Published On: 

नागपूर : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीने मुंबईतल्या क्रूझ ड्रग्ज पार्टीवर धाड टाकली होती. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे वारंवार एनसीबी आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय. यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. नवाब मलिक आणि आर्यन खान हे दोन विषय वेगळे आहेत. नवाब मलिक यांचे एनसीबी आणि त्याच्या अधिकाऱ्यांवर काही आक्षेप आहेत. त्यामुळे ते वारंवार बोलत असतात, असेही गृहमंत्री म्हणाले. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. नवाब मलिक यांची एनसीबी विभागा संदर्भात तक्रार आहे असे दिसते. त्यामुळे एनसीबीविरोधात ते सातत्याने आवाज उठवत आहेत, त्याबद्दल बोलत आहेत असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार समीर वानखेडे यांची चौकशी करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की, ‘समीर वानखेडे हे केंद्र शासनाच्या सेवेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’. तसेच वर्षभरात तुझी नोकरी जाईल आणि तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असे जाहीर आव्हान नवाब मलिक यांनी समीर वानखडेला दिले. त्यावरही वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘नवाब मलिक यांनी काही विधान केले असेल तर त्याबाबत मला अद्याप काहीही माहिती नाही. तसेच त्यांनी असा कोणताही पुरावा माझ्याकडे अद्याप दिलेला नाही. मी त्यांच्याकडून माहिती घेईन पण आता तरी माझ्याकडे कोणतीच माहिती नाही, अशी सावध भूमिका गृहमंत्री वळसे पाटील यांनी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!