Share

‘नितीन राऊतांनी माफी मागावी अन्यथा मुख्यमंत्री ठाकरेंनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेसचे नते नितीन राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत नितीन राऊत यांनी वादग्रस्त पोस्ट केली. त्यांनी इंदिरा गांधींच्या काळातील दोन टपाल तिकीटं फेसबूकवर पोस्ट करत त्यावर कॅप्शन दिले. या पोस्टवरुन भाजप नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. वादग्रस्त फेसबूक पोस्ट टाकत वाद ओढवून घेणारे नितीन राऊत यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यानंतर राऊंतानी ही फेसबूक पोस्ट हटवली आहे.

दरम्यान, राऊत यांच्या निषेधार्थ भाजप नेते अतुल भातखळखर यांच्या नेतृत्त्वाखाली ‘जोडे मारा’ आंदोनल करण्यात आले. आज कांदिवली परिसरात मंत्री राऊत यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांना इशारा दिला. नितीन राऊतांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी केली आहे. भाजप नेते अतुल भातखळखर यांनी नितीन राऊतांना इशारा दिला आहे.

‘भाजपाच्या दणक्याने नरमलेल्या नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारी पोस्ट डिलीट केली, परंतु हे पुरेसे नाही. त्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा. माफी नाही तोपर्यंत, आंदोलन सुरू राहील’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी सावरकरांविषयी एक वक्तव्य केले होते. महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, असा दावा त्यांनी केला. त्यावरून पुन्हा एकदा वाद-प्रतिवाद सुरू झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही टपाल तिकीटे आपल्या अकाऊंटवर पोस्ट केली होती.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये नितीन राऊत यांनी दोन टपाल तिकीटांचे फोटो पेस्ट केले होते. यामध्ये एका टपाल तिकीटावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो होता. त्याची किंमत २० इतकी आहे तर दुसऱ्या तिकीटावर माकडाचा फोटो असून त्याची किंमत १०० इतकी आहे. इतकेच नाही तर ही पोस्ट करताना नितीन राऊत यांनी त्यावर लिहिले होते की, ‘इंदिरा गांधींच्या काळात ही टपाल तिकीटं छापण्यात आली होती. माकडाची किंमत पाच पटीने जास्त आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!