🕒 1 min read
मुंबई : सध्या देशभरात इंधनदरवाढ या मुद्द्यावरील चर्चांना उधाण आले आहे. गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल १५ वेळा इंधनदरवाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना त्या म्हणाल्या की,’महागाई वाढवणारं सरकार केंद्रात सत्तेत आहे. मग कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय? सगळं काही महाग झालं आहे. अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत. यावर मी काय बोलू?,’ असे म्हणत त्यांनी महागाईवरून विरोधकांचे कान टोचले आहेत.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या क,’सिलेंडरचे भाव यासाठी वाढलेत कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा. तेलाचे भाव यासाठी वाढले आहेत कारण लोकांचं आरोग्य व्यवस्थित रहावे. डिझेल पेट्रोलचे भाव यासाठी वाढलेत की करोना काळात लोकांनी बाहेर पडू नये. तसेच अशी स्पष्टीकरणं केंद्र देणार असेल तर यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल,’ असेही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- भारताने सर्वांत कमी कालावधीत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला-पंकजा मुंडे

