Share

पुण्यात राबविली जातेय थेट सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण मोहीम

Published On: 

पुणे : महानगरपालिका हद्दीतील ज्या नागरिकांचं, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अजून झालेलं नाही त्यांच्यासाठी थेट सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याची विशेष मोहीम पुणे महानगरपालिका राबवत आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल दिली.

ज्या गृहसंस्था, सोसायटीमधील नागरिकांचे लसीकरण राहिलेलं आहे, अशा सोसायट्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अपेक्षित लाभार्थी संख्या कळवावी असं आवाहन महापौर मोहोळ यांनी केलं आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत, क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर, लसीकरण चमू थेट त्या सोसायटीमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव कोणत्या शहरात असेल तर ते म्हणजे पुणे शहर. पुणे शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण अढळून आले होते. त्याच बरोबर मृत्यूची संख्याही सर्वाधिक होती.

हीच रुग्णवाढ आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेने जीवाचं रान करत शहरासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांना पुणेरांनीही भक्कम साथ दिली. आज समस्त पुणेकरांच्या साथीला आणि महापाालिकेच्या प्रयत्नांना यश आलंय. 6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच पुण्यात काल कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. असं असलं तरी महापौरांनी याचं सर्व श्रेय पुणेकरांना दिलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!