Share

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये 23 जणांचा मृत्यु ;13 जण बेपत्ता

Published On: 

🕒 1 min read

कोट्टायम : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यु झाला आहे. कोट्टायम जिल्ह्यात 13 जण बेपत्ता झाले असून, इडुक्की जिल्ह्यात नऊ लोकांच्या मृत्युची नोंद झाली. थिरूवअनंतपुरममध्ये एक जण वाहून गेल्याची माहिती आहे.

इडुक्की जिल्ह्यात कोक्कायार परिसरात ढिगाऱ्याखालून चार मुलं, एक पुरूष आणि एक महिला यांना वाचवण्यात यश आलं आहे. अजून दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोटीकल पंचायतमध्येही पुन्हा दरड कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखालून 8 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. राज्यातील सर्व परिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासोबत राज्यातील अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांविषयी चर्चा केली. पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशांच्या मालिकेतून अतिवृष्टी आणि दरडींच्या घटनेमध्ये मृत पावलेल्या नागरिकांविषयी दुःख व्यक्त केले. राज्यात बचाव कार्य वेगात सुरू असून, त्यांनी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थनाही केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!