🕒 1 min read
मुंबई : मागील वर्षापासून असणाऱ्या कोरोना संकटामुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले. यामुळे अनेक उद्योग धंदे बंद झाले. यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. त्यानंतर सध्या कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर अनेक भागात नोकरीच्या संधी निर्माण होत आहे. मात्र असे असताना दुसरीकडे बेरोजगार वर्गाची फसवणूक देखील केली जात आहे. नोकरीसाठी चुकीचे मेसेज पाठवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत केंद्र सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्युरो या संस्थेच्या फॅक्ट चेकने सावध केले आहे.
वायरल मैसेज में दावा किया गया है कि भारत सरकार 'प्रधानमत्री बेरोजगार भत्ता योजना' के तहत सभी बेरोजगारों को ₹3500 प्रति माह दे रही है#PIBFactCheck
▶️ भारत सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है
▶️ किसी भी संदिग्ध लिंक पर क्लिक ना करें यह धोखाधड़ी का प्रयास हो सकता है pic.twitter.com/qwusnjkQF4— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 16, 2021
व्हायरल मेसेजमध्ये म्हंटले की, की, ‘पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना 2021 साठी प्री-रजिस्ट्रेशन केलं जात आहे. या योजनेअंतर्गत सर्व तरुण बेरोजगारांना दरमहा 3500 रुपये देण्यात येतील. प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन फॉर्म भरा.’ यामध्ये एक लिंक देण्यात आली असून त्यावर रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरण्याचे आवाहन केले जात आहे. या मेसेजनुसार यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास तर वयाची मर्यादा 18 ते 40 वर्षे आहे.
PIB Fact Check ने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार सर्व बेरोजगारांना ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजने’अंतर्गत 3500 दरमहा देत आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही. कोणत्याही संशयास्पद दुव्यावर क्लिक करू नका हा फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो.’असे म्हणत लोकांना सावध केले आहे.
हत्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर असल्यानेच चुकवलेले पैसे जमा करावे लागले’
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- रिया चक्रवर्तीच्या ‘त्या’ फोटोने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
