Share

विविध मागण्यांसाठी २४ ऑक्टोंबरला लिंगायत समाजाचा महामोर्चा, समन्वय समितीची माहिती

Published On: 

परभणी : लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी व राज्यस्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळविण्यासाठी परभणी येथे रविवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयावर लिंगायत समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक ॲड.अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठीची केंद्र सरकारला शिफारस करा, राज्यातील लिंगायत धर्मियांना, धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करा, महाराष्ट्र राज्यात लिंगायत बेरोजगार युवकांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, मंगळवेढा येथील मंजूर असलेल्या महात्मा बसवण्णांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करा, लिंगायत आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून उच्चस्तरीय चौंकशी करा, परभणी शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभा करावा या प्रमुख मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.

परभणी शहरातील ईदगाह मैंदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा धडकणार आहे. यात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी समन्वय समितीच्या वतीने ॲड.अविनाश भोसीकर यांनी केले आहे. यावेळी किर्तीकुमार बुरांडे, बबलू सातपुते आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!